देगावकर कुटुंबियांनी चक्क टेरेसवर पेले रोपाचे जतन
प्रतिनिधी/ सातारा
रुद्राक्ष हे बीज परंपरेनुसार हिंदू धर्मात प्रार्थनेसाठी वापरले जाते. अतिषय दुर्मिळ असणारी ही वनस्पती नेपाळ किंवा बाली व भारतात मुख्यतः हिमालयाच्या पायथ्याला अढळुन येते. पण साताऱयातील देगावकर शरद व विद्या देगावकर या दांपत्यांनी चक्क आपल्या टेरेसवर याच्या रोपाची लागवड मागील काही वर्षा पुर्वी केली होती. आणि सध्या हे वृक्ष चांगलेच बहरले असुन याला रूद्राक्षाची फळे लागली आहेत.
देगावकर कुटुंबियांची रंगोली नावाची सातारा शहरातील केसरकर पेठ मार्गावर नर्सरी आहे. त्यांना पुर्वी पासुनच वृक्ष लावडीची आवड असल्याने त्यांच्या नर्सरीत अनेक वनस्पतींची त्यांनी लगवड केली आहे. त्यातच त्यांनी रूद्राक्षाच्या रोपाची लागवड ही केली होती. आणि आत्ता हे वृक्ष चांगलेच बहरले असुन त्याला अनेक अशा तिन मुखी रूद्राक्षांची फळे लागली आहे. अनेक वृक्षप्रेमी अगदी उत्सुकतेने हे बहरेले वृद्राक्षाचे रोप पाहण्यास येत आहेत.
रूद्राक्षांना धार्मिक असे खुप महत्व असुन याची भारताबरोबरच परदेशात ही तितकीच मागणी आहे. कारण रुद्राक्षाचे फळ हे भगवान शंकराच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते. तसेच त्याचे औषधीक महत्वही तितकेच आहे. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयीन युवक-युवती फॅशन, टँडी स्टाईल म्हणून ही रूद्राक्ष आपल्या गळय़ात घालतात.
अन् फळे यायला सुरूवात झाली
मागील पाच ते सहा वर्षा पुर्वी आम्ही टेरेसवर रूद्राक्षाचे रोप लागवायचे ठरविले. त्यानुसार त्याची लागवड 10 ते 12 इंची कुडीमध्ये केली, मागील वर्षी पासुन हे रोप चांगलेच बहरले असुन त्याला रूद्राक्षाची फळे यायलाही सुरूवात झाली आहे. यापुर्वी एकमुखी व सध्या तीनमुखी रूद्राक्ष याला आले आहेत. हे रूद्राक्षाचे फळ गळून पडल्यानंतर त्या फळाला लवकरच सोलावे लागते. तरच रूद्राक्ष अपल्याला मिळते काही दिवसानंतर ते सोलायला गेल्यास आपल्याला फळ मिळत नाही.
शरद देगावकर