अग्निपथ विरोधातील आंदोलनाच्या इशाऱयानंतर कडक बंदोबस्त ;
प्रतिनिधी/ तारा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अग्निपथ अग्निवीर ही योजना जाहीर केली आहे. त्या योजनेला सातारा जिह्यातून कडाडून विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर जोरदार साखरपेरणी सुरु होती. त्याचीच कानकुण सातारा पोलिसांना लागताच पोलीस दलाच्यावतीने साताऱयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अगदी पोवई नाका शिवतीर्थ येथे सुमारे 20 पोलीस कर्मचारी, पोलीस निरीक्षक, सह पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्याह दोन पिंजरे तैनात करण्यात आले होते. वाढे फाटा, बाँम्बे रेस्टाँरट चौक, शिवराज पेट्रोल पंप चौक, अजंठा चौक येथे मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनाचा इशारा देणाऱया राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असून येत्या दोन दिवसात पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने नव्याने अग्निपथ योजना आणली आहे. ही योजना युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असून युवकांचे वय जेव्हा करिअर करण्याचे असते तेव्हाच अग्निवीर म्हणून भरती झाल्यानंतर लगेच चार वर्षात सेवानिवृत्त होऊन परत आल्यानंतर त्या युवकास पुढे नोकरीच्या संधी नसणार आहेत. त्यामुळे युवक बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे ही योजनाच केंद्र सरकारने बंद करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी सेलच्यावतीने सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार शहरासह गावातील युवकाच्या मोबाईलमध्ये स्टेट्सवर आजच्या आंदोलनाचे आवाहन करणारे व्हिडिओ व फोटो फिरत होते. त्याच अनुषांगाने सातारा पोलिसांनी इतर राज्यात जशी हिंसक आंदोलने झाली आहेत. तसे आंदोलन साताऱयात होवू नये या पाश्वूभूमीवर त्या पोस्टच्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व पोलीस दलाला सुचना दिल्या. सातारा शहरात हे वाढे फाटा, पोवई नाका येथे आंदोलनाची शक्यता दर्शवून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोवई नाका येथे सकाळपासून 20 पोलीस कर्मचारी, एक अधिकारी आणि डीवायएसपी ऑचल दलाल याच्याकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन पिंजरेही बंदोबस्ताला होते. तसेच वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज चौक, अंजठा चौक येथे मोठा बंदोबस्त ठेवला होता.
दोन दिवसात आंदोलन करणार
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, शाहुपूरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच सहपोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्याकडून बंदोबस्त होता. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येणार होते. त्यांनी आंदोलनासाठी परवानगी पोलिसांकडे मागीतली होती. परंतु पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केल्याने सध्या हे आंदोलन तुर्तास स्थागित करत आहोत. येत्या दोन दिवसात हे आंदोलन करण्यात येईल.
तेजस शिंदे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
सोशल मीडियावरील त्या पोस्टचा पोलीस घेताहेत शोध
युवकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारी व वाढे फाटा येथे आंदोलनासाठी या असे आवाहन करणारी पोस्ट नेमकी कोणी तयारी करुन सोशल मीडियावर सोडली त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पाठीमागे शाळांच्या ऑफलाईन परीक्षेबाबत सोशल मीडियावर आंदोलनाचा इशारा देणाऱया हिंदूस्थानी भाईला जसे पोलिसांनी शोधले होते. तसेच आताही पोलिसांचा सोशल मीडियावर तरुणांची माथी भडकवणारी पोस्ट तयार करणाऱयांचा पोलीस शोध घेत असल्याचे सातारा शहर पोलिसांनी सांगितले.