वार्ताहर / कास
कोरोनाच्या वाढत्या प्राद्रुर्भावामुळे प्रशासनाच्या सुचनेनुसार कोयना पुर्नवसित तांबी ता. सातारा येथील वाघजाई महाकाली देवीची वार्षीक यात्रा साध्या पधदतीने साजरी करण्यात येणार असुन भाविकांना यात्रा काळात तीन दिवस मंदीर दर्शनासाठी बंद राहणार असुन यात्रे दिवशी फक्त ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पुजा आरती मानपान व धार्मीक विधी कार्यक्रम केले जाणार आहेत. तरी भाविकांनी यात्रेच्या कालावधीत दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे अवाहन देवस्थान ट्रस्ट मंडळाकडुन करण्यात आले आहे.
हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या तांबीच्या वाघजाई महाकाली देवीची वार्षीक यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भरते. यात्रेला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र या वर्षी कोरोनामुळे प्रशासनाच्या सुचनेनुसार यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असुन यात्रा काळात ११ मार्च ते १३ मार्च असे तीन दिवस मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार असुन मंदीर परिसरात गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दुकाने, स्टॉल लावण्यावरही बंदी असुन इतर गावच्या पालख्या सासनकाठया व मिरवणुकीवरही बंदी आहे त्यामुळे भाविकांनी सहकार्य करून यात्रा काळात दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन ट्रस्ट मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.