शहराच्या मध्यभागी सुरू जुगाराचा खेळ : बड्या धेंड्यावर कारवाई कधी ?
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील मध्यवती ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर शहर, शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. एकाच दिवशी दहा जुगार अड्डयावर कारवाई करण्यात आली. परंतु ठोस कारवाई करण्याची मागणी होत असताना पोलिसांकडून पोकळ कारवाई करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहेत. बड्या धेंड्यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शहर पोलिसांची जुगार अड्डयांवर कारवाई
कोडोली येथील भांड्याच्या दुकानासमोर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी निकेतन पिसाळ (रा. करंजेपेठ सातारा), चंद्रकांत चोरगे (रा. रविवार पेठ सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 हजार 975 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. अशीच कारवाई पारंगे चौकाकडे जाणाऱ्या गणपतीच्या मंदीर परिसरात करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमित बनसोडे (वय 27, रा. म्हसवे सातारा) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 945 रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.
अंजठा चौक परिसरातील जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी कुमार गायकवाड (वय 43, रा. विक्रांतनगर सातारा), चंद्रकांत चोरगे (रा. चुना गल्ली रविवारपेठ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार 175 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. सेव्हन स्टार मॉल परिसरात सुरू असलेल्या जुगार अ•यावर पोलिसांनी छापा टाकला. दशरथ फरांदे (वय 68, रा. गडकर आळी सातारा), गणेश ढोकळे (करंजे पेठ सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार 552 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. कोडोली येथील पानटपरीच्या शेजारील मोकळ्या जागेत सूरू असलेल्या जुगार अ•यावर शहर पोलिसांनी कारवाई केली. शुभम कांबळे (वय 25, रा. विकासनगर खेड) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 हजार 190 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, एक मोबाईल असे जप्त केले. शिवराज पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या जुगार अ•dयावर पोलिसांनी छापा टाकून संतोष मेटकरी (वय 48, रा. fिंवलासपूर) या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 हजार 415 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.
शाहूपुरी पोलिसांची जुगार अड्डयांवर कारवाई
मार्केट यार्ड परिसरातील बॅँकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. लक्ष्मण पवार (वय 65, रा. नुने ता. पाटण), गणेश ठोकळे (रा. करंजे पेठ सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार 25 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. मोळाचा ओढा चौक येथे जुगाराच्या अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी फिरोज झारी (वय 53, रा. तामजाईनगर सातारा), विकास निकम (रा. आंबेदरे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 810 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. जुना मोटर स्टॅन्ड येथील परिसरातील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून गुरूप्रसाद साठे (वय 27, शुक्रवार पेठ), सतीश मते (रा. मोळाचा ओढा सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 हजार 522 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, एक मोबाईल जप्त केला आहे. याच जुना मोटार स्टॅन्ड येथील संकुलच्या आडोशाला सूरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी बबलु सय्यद (वय 35, रा. गुरूवार पेठ सातारा), संदीप शिंदे (वय 30, रा. बदामाची विहिर), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 हजार 804 ऊपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, एक मोबाईल जप्त केला आहे.