प्रतिनिधी / सातारा :
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणून लाभलेल्या साताऱ्याची ओळख ‘राजधानी सातारा’ म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. अशा या साताऱ्यात ऐतिहासिक व पुरातन कालीन विविध वस्तु, ऐतिहासीक वाडे, गड किल्ले यांची साक्ष देतात. हे इतिहास कालीन साक्ष देणारे पुरावे समस्त शिवभक्तांचे प्रेरणा स्थान आहेत. त्यातीलच एक ऐतिसासीक ठिकाण म्हणजे सातारा शहराच्या मध्यवर्ती असणारा ‘राजवाडा’, प्राचीन असलेला हा राजवाडा आजही अनेक इतिहासकालीन घटनांना उजाळा देतो. पण मागील दोन दिवसांपासुन या राजवाडय़ासमोर ‘डॉ. अजितकुमार देव’ नामक एक पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळय़ामुळे सातारकरांच्या भावना दुखाविल्यामुळे सातारकरांमधुन संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या.
दोन दिवसांपुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी हा पुतळा येथील गोल बागे समोर बसविला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पुतळा येथील अजिंक्य गणेश रिक्षा स्थानक येथे बसविण्यात आला होता. कोणतीच कल्पना न देता अचानक बसविण्यात आलेला हा पुतळा पाहुन परिसरातील नागरिकांतर्फे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
त्यानंतर याबाबत खातरजमा केली असता. ‘डॉ. अजितकुमार देव’ म्हणजे मागील काही दिवसांपुर्वी झी मराठीवर ‘देव माणुस’ नामक मालिका सुरू होती. त्यातील मुख्य पात्राचा हा पुतळा असल्याचे समजले. पण हा मालिकेतील डॉ. अजितकुमार देव याने अनेकांचे खून केल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे अशा व्यक्तीचा हा पुतळा साताऱ्यातील ऐतिहासीक ठिकाणासमोर लावण्यात आल्याने नागरिकांकडुन संपप्त प्रतिक्रीया उमट आहेत.