सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन लांबवल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सह पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात असलेली सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्याचा शोध घेताना पोलिसांना अडचण निर्माण झाली. त्या चोरट्यांच्या वर्णनावरुन पोलीस शोध घेत आहेत.
लॉकडाऊनच्या काळानंतर सध्या कुठे व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. असे असताना गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे. आज दुपारी यादोगोपाळ पेठेत एक महिला काही कामानिमित्ताने चालली असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. अचानक घडलेल्या घटनेनी ती महिला घाबरुन गेली. तिने याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिकांनी व त्या महिलेने केलेल्या वर्णनावरुन सातारा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.