प्रतिनिधी / सातारा :
एमआयडीसी पोलीस चौकी ते फुलोरा हॉटेलला जाणाऱ्या मार्गावर एका ट्रकमधून 17 लाखांचा गुटखा जप्त करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. शंकर केरू केदार (वय 38), सुभाष हरीभाऊ घगु (वय 62, रा. धनकवडी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी पोलीस चौकी ते फुलोरा हॉटेलला जाणाऱ्या मार्गावर शिवराज पेट्रोल पंपाच्या समोरील ब्रीजवरून ट्रक (एमएच 12 एसएक्स 2726) मधून चालक शंकर केदार, सुभाष घुगे हे गुटख्याची वाहतूक करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली. खुटखा विक्रीला परवानगी नसताना यांची वाहतूक होत असल्याने तात्काळ यावर कारवाई करण्याचे आदेश निंबाळकर यांनी दिले. या आदेशानुसार दि. 30 रोजी पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास ट्रकवर पोलिसांनी छापा टाकला. आणि 10 लाखांच्या ट्रकसह 17 लाखांचा गुटखा जप्त केला. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक कदम करत आहेत.