सातारा / प्रतिनिधी
विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 2 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये फलटण तालुक्यातील बरड 26 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
103 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 31, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 15, रायगाव येथील 16, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील 11 महाबळेश्वर येथे 14 एकूण 103 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
डिस्चार्ज देण्यात आलेल्या एका रुग्णाचा कोरोना चाचणीचा नमुना दुबार पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 973 झाली आहे. तसेच डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या 713 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्यांची संख्या 218 इतकी झाली असून मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 42 इतकी झाली आहे.