वृत्तसंस्था/ कौलालंपूर
2023 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या पहिल्या मलेशिया खुल्या सुपर 750 पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर फायनल्समधील चॅम्पियन्स चीनच्या लियू चेन आणि ओयु ई यांचा 17-21 22-20, 21-9 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता या स्पर्धेत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची उपांत्य फेरीत गाठ चीनच्या केंग आणि चेंग यांच्याशी होणार आहे.
प्रणॉयचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
2023 च्या बॅडमिंटन हंगामाला येथे मलेशिया खुल्या सुपर 750 पुऊष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेने प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या एच. एस. प्रणॉयचे पुऊष एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. जपानच्या सातव्या मानांकित कोडाई नाराओकाने प्रणॉयचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
पुऊष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानचा सातवा मानांकित तसेच 21 वषीय नाराओकाने एच. एस. प्रणॉयचा 84 मिनिटांच्या कालावधीत 21-16, 19-21, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. नाराओकाचा प्रणॉयवरील हा तिसरा विजय आहे. उभयतांमध्ये यापूर्वी दोनवेळा सामने झाले होते आणि त्यात प्रणॉयला हार पत्करावी लागली होती. शुक्रवारच्या सामन्यात नाराओकाने पहिला गेम जिंकल्यानंतर प्रणॉयने आपल्या स्मॅश फटक्मयांवर नियंत्रण ठेवत दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये नाराओकाने प्रणॉयला वारंवार नेटजवळ खेचत चांगलेच दमविले. दमछाक झाल्याने प्रणॉयचे फटके चुकीच्या पद्धतीने नोंदविले गेल्याने नाराओकाने आपला विजय नोंदविला. जपानच्या नाराओकाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी द्वितीय मानांकित लि जियाचा तसेच यंगचा पराभव केला होता. प्रणॉयकडून नाराओकाला 12 मॅचपॉईंट्स बहाल करण्यात आले.