वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक संकटाचा सामना करणारी येस बँकेचे समभाग मागील सात व्यापारी दिवसांमध्ये तेजी नोंदवली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या व्यवहारांवर प्रतिबंध लावल्यानंतर 6 मार्चपासून बँकेचे समभाग 5.55 रुपयावर पोहोचले आहे. येस बँकेचे समभाग 17 मार्चपर्यंत तेजीसोबत प्रत्येक समभाग 63.2 रुपयावर पोहोचले आहेत. या हिशोबासोबत कंपनीचे समभाग मागील सात दिवसांमध्ये 1,038 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. तसेच आजच्या व्यवहारातही (18 मार्च) ग्राहकांकडून देवाणघेवाण झाल्यास सर्वोच्च पातळी गाठण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
तेजीची मुख्य कारणे …
- बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने स्टेट बँकेला दिलेली मान्यता
- स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, फेडरल, बंधन बँक, आदी बँकांची गुंतवणूक
- आर्थिक संकट दूर झाल्यावर बँकेच्या सर्व सुविधा 18 मार्चपासून सुरु होणार असल्याची आशा