अथणी, निपाणी, बैलहोंगल, हिरेबागेवाडी येथील बाधितांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
रामदुर्ग तालुक्मयातील सात महिन्याच्या बालिकेसह 9 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. जिह्यातील एकूण 153 बाधितांपैकी 119 जण बरे झाले आहेत.
कुडची येथील रुग्ण क्रमांक 1226, निपाणी येथील 1227, मोळवाड (ता. अथणी) येथील रुग्ण क्रमांक 1489, 1490, 1493 संपगाव (ता. बैलहोंगल) रुग्ण क्रमांक 1491, 1492, रामदुर्ग तालुक्मयातील कल्लूर येथील रुग्ण क्रमांक 1496 ही सात महिन्याची बालिका, हिरेबागेवाडी येथील रुग्णक्रमांक 1562 हे पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
सात महिन्याच्या कोरोनाग्रस्त बालिकेची व्यवस्था करण्यासाठी तिचे आई-वडिल तिच्या सोबतच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. त्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांनाही सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे. या बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून या 9 जणांना निरोप दिला.
बिम्स् प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सात महिन्याच्या बालिकेसह कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना रुग्ण वाहिकेतून त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. पुढील 14 दिवस त्यांना घरीच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामध्ये अजमेर व सम्मेद शिखरजीहून जिह्यात परतलेल्या भाविकांचा समावेश आहे.
वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात बेळगाव-बागलकोट जिह्यातील आणखी 41 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. यापैकी चार गर्भवती महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चारपैकी एका महिलेचीही सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
2374 अहवालांची प्रतिक्षा
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने सोमवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 2374 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्य़ातील 5 हजार 945 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 14 हजार 381 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
सोमवारी बेळगावला दिलासा
सोमवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये बेळगाव जिह्यातील रुग्णांचा उल्लेख नव्हता. रविवारी जिह्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आणखी 2374 जणांचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे सोमवारी बाधितांची संख्या वाढणार ,अशी भिती होती. मात्र बेळगावला किंचित दिलासा मिळाला आहे.