नवी दिल्ली
देशामधील वस्तूंची निर्यात मागील सात महिन्यांच्या प्रवासानंतर प्रथमच वधारली असल्याची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील निर्यात वर्षाच्या आधारे 5.99 टक्क्यांनी वाढून 27.58 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलेली आहे. याच दरम्यान आयातीत मात्र 30.31 अब्ज डॉलर्सची घट नेंदवली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे.
निर्यात वाढ आणि आयातीत घट केल्याच्या कारणामुळे व्यापार तुटीत घट होत 2.72 अब्ज डॉलर्सवर आली आहे. जी एक वर्षाच्या समान कालावधीत 11.67 अब्ज डॉलर्सवर होती. सप्टेंबर 2019 मध्ये भारताने 26.02 अब्ज डॉलर्सची निर्यात आणि 37.69 अब्ज डॉलर्सची आयात केली होती.