वृत्त संस्था/ टयुनिस
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीटी कंटेडर टय़ुनिस टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या जी साथियन-हरमित देसाई यांनी पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
शुक्रवारी झालेल्या पुरूष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात साथियन-हरमित देसाई यांनी हंगेरीच्या इसेकी-झुडी यांचा 8-11, 12-14, 11-9, 11-8, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मात्र या स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या साथियन-मनिका बात्रा यांना उपांत्य फेरीत फ्रान्सच्या लिबेसन आणि जिया युआन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.