ऑनलाईन टीम / ढाका :
किशोरवयीन मुलांचा सायबर छळ रोखण्यासाठी ‘सायबर टिन’ हे ॲप तयार करणाऱ्या सादत रहमान या 17 वर्षीय बांग्लादेशी मुलाला यंदाचा ‘जागतिक शांतता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाया युसूफ यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
बांग्लादेशात सायबर छळाला कंटाळून एका 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्यानंतर सादतने किशोरवयीन मुलांची सायबर छळापासून सुटका करणारे ॲप तयार केले. गरजू किशोरवयीन मुलांना मदत मिळवून देणारे व्यासपीठ म्हणून सादतने या ॲपचा प्रचार सुरू केला. तसेच चळवळही उभारली.
सायबर छळ सहन करणाऱ्या जवळपास 300 गरजूंना या ॲपद्वारे मदत मिळवून दिली आहे. तर असा छळ करणाऱ्या आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.