ऑनलाईन टीम / मुंबई :
गोमूत्र पिल्याने कोरोना होत नाही, असा दावा करणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना तातडीने विमानाने भोपाळहून मुंबईत आणले. सध्या मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रज्ञा सिंह यांची शनिवारी जिल्हा पंचायत समितीच्या कार्यालयात एक बैठक होती, पण तत्पूर्वीच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आज त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी डिसेंबर महिन्यातही साध्वी प्रज्ञा यांची तब्येत बिघडली होती, तेव्हा त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.