वृत्तसंस्था/ ओस्ट्रेव्हा
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या ओस्ट्रेव्हा खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने चीनच्या शुई झेंग समवेत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. 2021 च्या टेनिस हंगामातील सानियाचे हे पहिले विजेतेपद आहे.
रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा आणि शुई झेंग या जोडीने अमेरिकेच्या ख्रिस्टेन आणि न्यूझीलंडच्या रूटेलफीचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. हा अंतिम सामना 65 मिनिटे चालला होता. गेल्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील एका स्पर्धेत सानियाला दुहेरीत उपविजेतेपद मिळाले होते.