वृत्तसंस्था / क्लेव्हलँड
डब्ल्यूटीए टूरवरील अमेरिकेतील क्लेव्हलँड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झाने अमेरिकन साथीदार ख्रिस्टीना मॅकहॅलेसमवेत दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
डब्ल्यूटीए टूरवरील 250 दर्जाच्या या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सानिया आणि मॅकहॅले या जोडीने नॉर्वेच्या इकेरी आणि अमेरिकेच्या हॅरीसन यांचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीत सानिया आणि मॉकहॅले यांचा सामना जपानच्या टॉप सीडेड अयोमा आणि शिबाहेरा यांच्याबरोबर होणार आहे.