कॉकेलस्केयुर : येथे सुरू असलेल्या लक्झमबर्ग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची साथीदार शुआई झँग यांनी महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात सानिया आणि शुआई यांनी जर्मनीच्या मॉर्डेरगेर भगिनींचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. सानियाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत सहावेळा दुहेरीतील ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविले आहे. 2021 च्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत शुआई झँगने ऑस्ट्रेलियाच्या स्टोसूरसमवेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. आता सानिया आणि शुआई यांचा पुढील फेरीतील सामना बेल्जियमच्या मिनेन आणि ऍलिसन व्हॉन युटेव्हेनिक यांच्याबरोबर होणार आहे.