वृत्तसंस्था / ऍडलेड
ऍडलेड खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित साबालेन्काला स्वीडनच्या रिबेका पीटरसनकडून पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. पुरूषांच्या एटीपी 250 दर्जाच्या येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या वूने विजयी सलामी दिली.
महिलांच्या एकेरीतील पहिल्या सामन्यात स्वीडनच्या पीटरसनने बेलारूसच्या साबालेन्काचा 5-7, 6-1, 7-5 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या बेंगलने रशियाच्या पोटापोव्हाचा 7-5, 6-6, 6-1, स्लोव्हेनियाच्या झिदान्सेकने वॅटसनचा 2-6, 6-2, 7-6 (7-4) असा पराभव केला. पुरूषांच्या विभागात कोरियाच्या वू ने पाचव्या मानांकित लॉईड हॅरीसचा 5-7, 7-5, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली.