साहित्यः
अर्धी वाटी साबुदाणा, 2 वाफवलेले बटाटे, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा तीळ, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, दीड चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा लिंबूरस, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी
कृतीः
प्रथम साबुदाणा धुवून पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवावेत. नंतर निथळून रात्रभर झाकूण ठेवावेत. म्हणजे छान फुलतील. वाफवलेले बटाटे सोलून बाऊलमध्ये मॅश करून घ्यावेत. नंतर त्यात भिजवलेले साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लिंबूरस, साखर, तीळ आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करीत मळून घ्यावे. आता हाताला थोडेसे तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे करून त्यावर हलके दाब देत वडा चपटा बनवून घ्यावा. आता गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करावे तेल चांगले गरम झाले की आच मंद करून त्यात वडा सोडून दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. आता तयार साबुदाणा वडा दही अथवा खोबऱयाच्या चटणीसोबत खाण्यास द्या.