शांतारुबन करणार दिग्दर्शन
अभिनेत्री सामंथा ही नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. पण आता तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये नवी घडामोड घडली आहे. अभिनेत्रीने तमिळ-तेलगू दोन्ही भाषांमध्ये निर्माण होणारा चित्रपट स्वीकारला आहे. चित्रपटाद्वारे शांतारुबन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. तर एसआर प्रभू यांची ड्रीम वॉरियर फिक्चर्स याची निर्मिती करत आहे.
सामंथा ही दक्षिणेतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सामंथा आता बॉलिवूडमध्येही जम बसवू पाहत आहे. याचमुळे ती मुंबईत घर विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तसेच तिने बॉलिवूडचे काही चित्रपट स्वीकारल्याचीही चर्चा आहे.
सामंथा यापूर्वी द फॅमिली मॅन 2 या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. ही वेबसीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. तर सामंथाचा नवा चित्रपट तेलगू आणि तमिळ भाषेत झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू करणार आहेत. सामंथा लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे.