प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्येही सामाजिक अंतर राखत साध्या पद्धतीने बेळगाव व परिसरात शनिवारी बकरी ईद साजरी करण्यात आली. दरवषी इदगाह मैदानावर मोठय़ा उत्साही वातावरणात सामूहिक नमाज पठण करण्यात येते. परंतु यावर्षी अशा मोठय़ा कार्यक्रमांवर मर्यादा आल्यामुळे मशिदींमध्ये 50 मुस्लीम बांधवांनी सामाजिक अंतर राखत नमाज पठण केले.
देश कोरोनाच्या संकटामुळे चिंतेत आहे. या संकटामधून देशातील प्रत्येक नागरिक बाहेर पडू दे, कोरोनाने सर्वत्र निराशा पसरली असून यातून जगण्याचा नवा प्रकाश मानव जातीला सापडू दे, अशी मागणी मुस्लीम धर्मगुरुंनी केली.
बेळगावच्या पोलीस हेडक्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, सुभाषनगर, शिवबसवनगर, जुना धारवाड रोड, अनगोळ, कॅम्प येथील विविध मशिदींमध्ये नमाज पठणाचा कार्यक्रम झाला. बऱयाच मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण करून आपल्या नातेवाईकांना फोनवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देणे यावर्षी टाळण्यात आले.
विविध ठिकाणी कोरोना वॉरिअर्सचा सत्कार
कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी काम केलेल्या नागरिकांचा शहरातील विविध मशिदींमध्ये सत्कार करण्यात आला. एकावेळी 50 नागरिकांनाच मशिदीमध्ये प्रवेश देण्यात येत होता. त्यानंतर उर्वरित 50 जणांना प्रवेश देण्यात आला. आलेल्या भाविकांना थर्मल स्क्रिनिंग करूनच मशिदीमध्ये प्रवेश देण्यात येत होता.