प्रतिनिधी /म्हापसा
कळंगुटातील सामाजिक कार्यकर्ते स्व्पनेश वायंगणकर यांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ तसेच धमकावण्याचा माजी सरपंच फ्रान्सिस्को रॉड्रीगीश यांच्याकडून झालेला प्रकार हा राजकीय हेतूने प्रेरीत आहे तसेच या घटनेमागे स्थानिक आमदार तथा मंत्री असलेल्या मायकल लोबो यांचा अप्रत्यक्षरीत्या हा असल्याचा आरोप कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी केला आहे. मंगळवारी सकाळी कळंगुटातील पुलुवेमा रिसॉर्टच्या सभागृहात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सिक्वेरा यांनी वरील आरोप केला. दरम्यान, या प्रकरणानंतर कळंगुट पोलिसांकडून संशयित रॉड्रीगीश यांना साधा समन्स सुद्धा पाठविण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एखाद्याच्या घरात घुसून त्याच्या व्रुद्ध आईवडिलांसमोर शिवीगाळ करणे तसेच मारहाणीची धमकी देणे दखलपात्र गुन्हा? असतांना देखील कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ हेतुपुरस्सर याबाबतीत वेळ काढत असल्याचा सिक्वेरा यांनी आरोप केला.
यावेळी स्वप्न?श यांनी या धमकी मागील माहिती पत्रकारांना दिली, आपण गेल्या वेळी निवडणुकीत उभा होतो . राजकीय सुडपोटी हे कृत केल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या घरी दुपारी येवून आपल्या पालकांसमोर आपल्यास फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी धमकी दिली. असे त्यांनी सांगतले. कलांगुटे पोलीस मंत्र्याच्या दबावाखाली चालत असल्याचा आरोप यावेळी स्वप्न?ष वयगणकर यांनी केला
मायकलची राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार
2012 पासून कळंगुटात हुकुमशाही राजवट चालवणाऱया मंत्री मायकल लोबो येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय कारकिर्दच संपुष्टात येणार असल्याचा सिक्वेरा यांनी निर्वाळा दिला. यापुढे मी स्वतः कळंगुटच्या राजकीय रणांगणात सक्रीय होऊन सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉगेस तिकीटासाठी प्रमुख दावेदार असलेल्यामध्ये आपण स्वताही असल्याचे जोजफ सिक्वेरा यांनी यावेळी स्पष्ट केल