प्रतिनिधी / बेळगाव
गरजुंना मदतीची गरज असते हीच गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते भैय्या उसूलकर आणि त्यांचे मित्र लॉकडाऊनच्या काळात मदत करण्यास पुढे आले आहेत. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सर्व उद्योग धंदे, व्यवसाय, कामगार वर्ग डबघाईला आले आहेत या सर्वात हाताच्या बोटावर राबून खाणाऱयांची अवस्था बिकट झाल्याने दररोज 100 गरजू लोकांना जेवण देण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक गरजू व्यक्ती आहेत. यांच्या मदतीस अनेक समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते मदतीस पुढे सरसावत असताना आपणही त्यांना मदत करावी या हेतूने ते पुढे आले आहेत.शहराच्या विविध भागात जाऊन ते सर्व गरजुंना अन्न पुरवित आहेत.त्यामुळे आपल्या आजूबाजूला अशी कोणतीही गरजू व्यक्ती असल्यास किंवा कुटुंब असल्यास त्यांनी 7411827701 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.