प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा बेळगावमध्ये शिरकाव झाल्यापासून पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. बंदोबस्ताच्या कारणास्तव त्यांना सतत घराबाहेर रहावे लागते. त्यांची अनमोल सेवा लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गोपाळ ओऊळकर हे कित्येक महिन्यापासून पोलिसांना दररोज पाणी पुरवतात.
ओऊळकर स्वखर्चाने पाण्याच्या बाटल्या खरेदी करून हिंडलगा, शौर्य चौक, चन्नम्मा सर्कल, ग्लोब टॉकीज, रेल्वे ओव्हरब्रिज, गोवावेस या ठिकाणी असणाऱया पोलिसांपर्यंत जाऊन त्यांना पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटाचा पुडा देत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीसुद्धा त्यांनी हे काम केले होते. दुसऱया लाटेदरम्यान सुद्धा त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली आहे. पोलीस हे कोरोना योद्धा असून ते नेहमी उभे असतात. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असायला हवे, असे गोपाळराव म्हणाले.