प्रतिनिधी/ बेळगाव
कंग्राळी खुर्द येथील रहिवासी छाया दिलीप सुंठणकर (वय 42) यांचे मंगळवार दि. 29 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. जवळचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्ते व कंग्राळी खुर्दचे ग्राम पंचायत माजी सदस्य अनिल सूर्यवंशी यांनी शाहूनगर येथील अनाथालयात दोन महिन्यांपूर्वी दाखल करून सेवा केली होती.
मागील दोन दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना बेळगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. माजी महापौर शिवाजी सुंठकर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.