आदित्य इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन यांचा पुढाकार
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या कोरोनामुळे अनेकजण घरीच बसून आहेत. मात्र काही सामाजिक संघ, संस्था आणि कार्यकर्ते अशा परिस्थितीत अनेकांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे ते देखील कोरोना वॉरियर्स म्हणावे लागेल, यात शंका नाही. मात्र यांच्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. त्यामुळे यांचाही सन्मान करण्यासाठी अशा कार्यकर्त्यांना टि-शर्ट देण्यात आले आहे. विजयनगर येथील मंडळ कार्यालयात हा कार्यक्रम झाला. आदित्य इंजिनिअरिंग कंस्ट्रक्शन्सचे सचिन उसुलकर यांनी मागील वषीही कोरोना काळात किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली होती. आताही टि-शर्टसाठी पुढाकार घेवून बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्याकडे 15 हजार रुपये सुपूर्द केले आहेत. यावेळी उचगाव महाशक्ती केंद्राचे प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, गुरुराज हलगत्ती, नारायण पाटील, राजू जोगळेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन उसुलकर यांनी यावेळी समाजासाठी मोठे सहकार्य करू आणि यापुढेही करतच राहू, असे आश्वासन दिले.