सावंतवाडी/ प्रतिनिधी-
कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या प्रशांत चिटणीस (वय 53, रा. सहजीवन परिसर कॉलनी, सर्किट हाऊसच्या पिछाडीस, कारंडे मळा) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुली असा परिवार आहे. जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा भक्तीसेवा विद्यापीठ सोसायटीचे विद्यमान सचिव ऍड. प्रशांत चिटणीस यांच्या त्या पत्नी होत. पूर्वाश्रमीच्या त्या संध्या गुरुनाथ प्रभू- आजगांवकर असून आजगाव येथील अॅड. स्वप्नील आजगावकर आणि शेखर आजगांवकर यांच्या त्या भगिनी होत.