ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे. मात्र, कोरोनाच्या ‘डेल्टा’ या अधिक संक्रमणकारक व्हेरिएंटने देशाची चिंता वाढवली आहे. नुकतेच ब्रिटनच्या एका अहवालात या व्हेरिएंटच्या लक्षणांमधील बदलांची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, सामान्य सर्दी, खोकलाही कोरोनाची लक्षणे असू शकतात.
ब्रिटनमध्ये मोबाईल ॲपद्वारे स्वयंचलित रिपोर्टिंग सिस्टिमद्वारे मिळालेल्या माहितीत कोरोनाच्या सामान्य लक्षणांत बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार सर्दी, खोकला ही देखील कोरोनाची लक्षणे असू शकतात. दरम्यान, प्रत्येक माणसाची रोग प्रतिकारशक्ती भिन्न आहे. त्यामळे माणसात एक व्हायरस नव-नवे संकेत आणि लक्षणे निर्माण करु शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीतील व्हायरलॉजीतील रिसर्च लीडर लारा हरेरो यांनी म्हटले आहे.