प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुका पोलिसांनी सायकल चोरास अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या 18 सायकली हस्तगत केल्या. प्रदीप अशोक शिंदे (वय 34, रा. पाटखळ) असे सशंयित आरोपीचे नाव आहे.
सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पाटखळ येथील दीपक शिंदे यांनी त्यांच्या सायकलीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरुन प्रदीप शिंदे यास ताब्यात घेताच त्याच्याकडे चौकशी केली. दरम्यान शिंदे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून चोरीच्या 18 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.