मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सायली संजीव सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून ती बऱयाचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. सायलीने नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिचा टॅटू पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत. सेलिब्रेटींमध्ये टॅटूचे क्रेझ बऱयाचदा पहायला मिळते. मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी टॅटू काढलेले पाहायला मिळाले आहेत. अजूनही बरसात आहे या मालिकेतील अभिनेत्री शर्मिला शिंदेने देखील मानेच्या खालील बाजूला जिनचा जादुई चिराग हा सुंदर टॅटू काढला आहे.
तिचा हा कलरफुल टॅटू तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सायली संजीवने देखील नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिने घुबडाचा टॅटू काढला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ‘घुबड कशाला काढलस?‘ घुबड अपशकून आहे मी जर घुबड टॅटू म्हणून काढला तर अपशकून म्हणून आई मला घराबाहेर काढेल. ‘सायली तू महालक्ष्मीच्या वाहनाला पायावर ठेवलं’ अशा कित्येक प्रतिक्रिया देऊन तिच्या चाहत्यांनी सायलीला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिच्या या टॅटूचे कौतुक देखील केले आहे. घुबडाचे दर्शन भारतात अशुभ मानले जाते तर परदेशात त्याला शुभ मानले जाते.