प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी'चे निबंधक अशोक पाटील यांनी विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथभेट देवून स्वागत केले.
अपर जिल्हाधिकारी असलेले पाटील हे मूळचे अंबप-पाडळी (ता. हातकणंगले) येथील असून
सारथी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सारथी'च्या योजनेतून 53 विद्यार्थी केंद्रीय सेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शंभर विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी फेलोशीप देण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या 5 हजार उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी तीन महिन्यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. बहुजन समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी त्यामुळे शिक्षण आणि नोकरीच्या प्रवाहात सामील होऊ शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सारथी’तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सुरवातीपासूनच प्रयत्नशील असून संयुक्त विद्यमाने विद्यार्थीहिताचे इतरही काही उपक्रम राबविता आले, तर त्यासाठीही विद्यापीठ सकारात्मक आहे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. या वेळी प्राणिशास्त्र अधिविभागातील डॉ. ए. डी. जाधव उपस्थित होते.
Previous Articleधोका वाढला : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजार पेक्षा अधिक रुग्ण
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.