श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन
मराठा आरक्षणासंदर्भात एक तासभर चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर :
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सकाळी ९ च्या सुमारास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे जाऊन भेट घेतली.
यावेळी `सारथी’ आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरगोस निधी देऊन भक्कम करा, अशा सूचना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाने आता स्वत: च्या पायावर उभे राहून सक्षम होण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाने घटना दुरूस्ती करून मराठा आरक्षण दिले पाहिजे.