डिचोली/प्रतिनिधी
सारमानस पिळगाव येथे फेरीधक्क्यावर जाणाऱया रस्त्यावर तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात ताळगाव येथील वृद्ध दांपत्य जखमी होण्याची घटना घडली. सारमानस येथे जाणाऱया रिक्षाने दुचाकी आणि स्विफ्ट कारला धडक दिल्याने सदर अपघात घडला.
सदर अपघात काल शनि. दि. 1 फेब्रु. रोजी सकाळी घडला. उपलब्ध माहितीनुसार जीए 07 एच 6881 हि एक्टिवा तिच्यामागून जीए 05 बी 5862 हि स्विफ्ट कार सारमानस येथून डिचोलीच्या दाशेने येत होते. तर जीए 04 टी 5713 हि रिक्षा डिचोलीहेन सारमानस येथे ज त असताना न्य? प्ला?टजवळ रस्त्यावर रिक्षाने प्रथम एक्टिवा दुचाकीला व ननतर स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवर स्वार असलेले रोहिदास नाईक (61) व शीला नाईक (58) हे अमरल ताळगाव येथील दांपत्य रस्त्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. तसेच स्विफ्ट कारमधील प्रवाशांनाही किरकोळ मार बसला. नाईक दांपत्याला उपचारासाठी गोमेकॉत पाठविण्यात आले. तर कारमधील प्रवाशांना प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी जाऊ देण्यात आले. या घटनेचा पंचनामा साबाजी देसाई यांनी केला. व तेच पुढील तपास करीत आहे.