विनम्र स्वभावाच्या जोरावर सैफकन्या सारा अली खान हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजपर्यंत ती नेहमीच तिच्या फॅन्सशी सेलिब्रिटी अटिटय़ूड न ठेवता हसतखेळत बोलताना दिसली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर तिच्या फॅन्सचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. सोशल मीडियावर सध्या सारा अली खानचा एक व्हिडिओ वायरल होतोय. ज्यामध्ये विकी कौशल आणि सारा खान एका मिटिंगसाठी गेले होते. तिथे फॅन्सनी या दोघांना गाठलं. तेव्हा सारा तिच्या गाडीत बसली होती आणि अचानक एक फॅन्स तिथे वडा-पाव घेऊन आला, तो ही साध्या पेपरमध्ये गुंडाळलेला. पण सारानं मात्र तो वडा-पाव हसत-हसत स्वीकारला आणि म्हणाली, ‘चलो दे ही दो’. वडा- पाव दिल्याबद्दल तिने फॅनचे आभारही मानले. साराच्या विनम्र वागणुकीमुळे सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव केला आहे. कुणी म्हटलंय ‘सारा खूप गोड आहे’, कुणी म्हटलंय ‘अमृता सिंगने तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेत’ तर कुणी म्हटलंय,‘साराला गोड खूप आवडतं आणि हेच तिच्या वागण्यातील गोडव्याचं प्रतिक आहे’.
संकलन – अनुराधा कदम