मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळय़ावेगळय़ा पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात आकाशवाणीवरील भक्ती संगीताने तर काही जण मन:शांती अनुभवण्यासाठी शास्त्राrय संगीत ऐकतात. उपनगरी रेल्वेने किंवा ‘बेस्ट’ बसने प्रवास करणारे नोकरदार, वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असतात. संगीतप्रेमी मराठीजनांसाठी ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम नेहमीच अग्रस्थानी राहिला असून गेली 25 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरांची मेहफिल सादर करत आहे.
हा यशस्वी रौप्यमहोत्सव आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी झी मराठी सादर करत आहे ‘सारेगमप एक देश एक राग’. या सोहळय़ाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर निभावणार आहेत. तसेच सारेगमपच्या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ‘पल्लवी जोशी’ देखील उपस्थित असणार आहे. या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लिटिल चॅम्प्समधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमफता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचेदेखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत. सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्जांमध्येदेखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे. तसेच पल्लवी जोशी, कमलेश भडकमकर आणि टीमसोबत सारेगमपच्या प्रवासाला उजाळा देतील.
या कॉन्सर्टमध्ये फक्त आवाजाचे सूरच नाही लागणार तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांचे आवडते विनोदवीर आणि मालिकांमधील कलाकारदेखील असणार आहेत. त्यामुळे ‘सारेगमप-एक देश एक राग’चा हा मंच लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. गाणी, किस्से आणि 25 वर्षांची धमाल या विशेष सोहळ्य़ात पाहायला मिळणार आहे. ‘सारेगमप एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार 24 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.