संगीत व्यवसायात सारेगामा इंडियाने 750 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या गुंतवणूकीच्या माध्यमातून येत्या काही वर्षात 25 ते 30 टक्के इतका महसूल वाढवण्याचा इरादाही कंपनीने बोलून दाखवला आहे.
ही रक्कम फक्त संगीत क्षेत्रासाठी खर्चली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. संगीत परवाना व चित्रपट व्यवसायात पुढील वर्षात 25 ते 30 टक्के विकासाचे ध्येय ठेवण्यात आले आहे.