बेळगाव : 174 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी नेताजी नारायण जाधव, उपाध्यक्षपदी प्रसन्ना पांडुरंग हेरेकर, मानद कार्यवाहपदी रघुनाथ भरमाजी बांडगी व सहकार्यवाहपदी लता सुरेश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचा ठराव ज्येष्ठ कार्यकारी सदस्य अभय याळगी यांनी मांडला व त्याला कार्यकारी सदस्य प्रा. विनोद गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 27 मार्च रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदर निवड एकमताने करण्यात आली.
यावेळी नूतन पदाधिकाऱयांना संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. मावळत्या अध्यक्षा सुनीता मोहिते व मावळते सहकार्यवाह ऍड. आय. जी. मुचंडी यांनी मागील कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी कार्यकारी सदस्य गोविंदराव राऊत, अनंत जांगळे, अनंत लाड, प्रताप पाटील व कर्मचारी उपस्थित होते.