प्रतिनिधी/बेळगाव
महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी हाती घेतलेल्या लढय़ाला हातभार लावण्यासाठी येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत यांनी धनादेश सुपुर्द केला. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह नेताजी जाधव, सहकार्यवाह ऍड. ईश्वर मुचंडी, अनंत लाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात राजषी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. दरवषी बेळगाव शहर व तालुक्मयातील मराठी माध्यमाच्या शाळेतील दहावी परीक्षेत प्रथम येणाऱया विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरव केला जात होता. शाहू जयंती निमित्त हा कार्यक्रम केला जात होता. पण यंदा अद्याप परीक्षा झाल्या नाहीत म्हणून तो कार्यक्रम रद्द करुन शाहू जयंती साजरी करण्यात आली.
आमदार राजेश पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्यामुळे बहुजन समाज सुशिक्षित होवू शकला. अनेक माणसे घडली, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. अनंत लाड यांनी शाहू महाराजांच्या जीवनाचा आढावा घेतला. यावेळी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ईश्वर मुचंडी यांनी आभार मानले.