प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती रविवारी साजरी करण्यात आली. दरवषी जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनामुळे साध्यापद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते यांच्या हस्ते सावित्रिबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह ऍड. आय. जी. मुचंडी, कार्यकारी सदस्य अभय याळगी, अनंत जांगळे, वाय. एम. तरळेकर, अनंत लाड, प्रा. विनोद गायकवाड ऍड. अमर यळ्ळूरकर, लता पाटील, संतोष नलवडे, प्रसन्न हेरेकर यासह कर्मचारी उपस्थित होते.