क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
दुसऱया सत्रात पाच गोल लादून साळगावकर स्पोर्ट्स क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील लढत चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबचा 5-0 असा दारूण पराभव केला. जीएफएच्या धुळेर फुटबॉल मैदानावर हा सामना खेळविण्यात आला.
साळगावकर क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो त्यांचा स्ट्रायकर स्टिफन सतरकर. त्याने या सामन्यात आकर्षक हॅट्ट्रिकची नोंद करताना 63व्या, 76व्या व 79व्या मिनिटाला तर स्टॅफ्लॉन डिकॉस्ताने 84व्या आणि फिझर गोम्सने 88व्या मिनिटाला गोल केले. पहिल्या सत्रात चर्चिल ब्रदर्सने साळगावकरच्या आघाडीपटूंना रोखण्यात यश मिळविले. जास्त वेळ खेळ मध्यभागीच झाला. सामन्याच्या 53व्या मिनिटाला स्टिफन सतरकरने गोल नोंदवून साळगावकर क्लबच्या गोलचे खाते खोलले. त्यानंतर स्टिफनने लागोपाठ दोन गोल नोंदवून साळगावकरची आघाडी तीन गोलापर्यंत नेली. स्टॅफ्लॉन डिकॉस्ता आणि फिझर गोम्सने शेवटच्या दहा मिनिटात दोन गोल करून साळगावकर क्लबची आघाडी पाच गोलापर्यंत नेली. या विजयाने साळगावकर क्लबला तीन गुण प्राप्त झाले.