माजी मंत्री दिलीप परुळेकर यांचा विश्वास : उमेदवारीसाठी दावा
प्रतिनिधी /म्हापसा
आपण भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून पक्षाबरोबर आहे. पक्ष ज्या दिवशी उमेदवार जाहीर करून कोणता निर्णय घेईल हे पाहून पुढे जाणार आहे. आपली भूमिका काय हे आत्ताच सांगणार नाही. साळगाव मतदारसंघात भाजपच्या तिकीटाचा दावेदार आपण आहे. तिकीट पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यालाच देण्यात येईल, असा ठाम विश्वास माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी दै. तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
जयेश साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आमचा एकही कार्यकर्ता दुसरीकडे गेला नाही. साळगावकरांना तिकीट दिल्यावर परुळेकरांना देणार की नाही, असे अनेकांना वाटत आहे. हा मतदारसंघ भाजपचाच आहे. पक्ष याबाबत फ्sढर विचार करणार यात शंकाच नाही, असे परुळेकर म्हणाले.
आपण आगामी निवडणुकीसाठी तिकीटाचा दावेदार आहे हे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितले होते. आपण पक्षाचा निर्णय शिरसलामत मानून बैठकीला गेलो नाही. त्यामुळे पक्षाला वाटले की आपण निवडणूक लढविणार नाही व त्यांनी केदार नाईक व रुपेश् नाईक यांची नावे सुचित केल्याचे परुळेकर यांनी सांगितले.
लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. आपण सुध्दा दुसऱया पक्षात जाणार ही अफ्ढवाच आहे. आपल्याकडे तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, मगो, काँग्रेस पक्षाचे नेते येऊन गेले. आपले मत काय आहे याची चौकशी केली. भाजपने आपल्यास नाकारल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ, असे आपण सांगितले असल्याचे परुळेकर म्हणाले.