कांदोळी/ वार्ताहार
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर 130 वी जयंती साळगाव मतदार संघातील भाजपा कार्यालयात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिक्षणासाठी , समाजाच्या कल्याणासाठी, आयुष्यभर संघर्ष करणारे , शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आजच्या या जयंतीनिमित्त करू या असे मत यावेळी माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केली,