वार्ताहर /लाटमबारसे
डिचोली तालुक्मयातील साळ येथील प्रसिद्ध गडे उत्सवाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहून होळीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, डिचोली मतदार संघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, चंदन परब, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.
साळ येथील कृष्णा परब यांच्या निवासस्थानी थोडा आराम करून जनतेचे अभिवादन स्वीकारत प्रथमतः श्री महादेव मंदिरात आगमन झाले. यावेळी श्री महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब, उपाध्यक्ष-रवी राऊत, मुखत्यार-आदिनाथ परब यांनी व महाजनांनी स्वागत केले . श्री महादेव मंदिरात जाऊन देवदर्शन केले.
पुरोहित यशवंत गाडगीळ करवी देवतास उज्वल भविष्यासाठी गाऱहाणे घातले. तसेच होळी पाशी येऊन मुख्यमंत्री सावंत व इतरानी होळीस श्रीफळ ठेवून होळीस पुष्पहार बांधला, तसेच पुरोहित यशवंत गाडगीळ याच्याकरवी गाऱहाणे घालण्यात आले व कौल घेऊन प्रस्थान केले. कालिदास राऊत, रूदेश नाईक, विष्णू परब, कृष्णा परब, दुर्गाराम परब, अभिषेक परब, रवी राऊत, नारायण भाईप, मुकू?द परब, आदिनाथ परब, सखाराम परब व इतर मान्यवर उपस्थित होते.