प्रतिनिधी /लाटंबार्से
साळ येथील श्री महादेव देवस्थान ( खालचावाडा ) व श्री सिद्धेश्वर देवस्थान ( वरचावडा ) येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दुपारपर्यंत गर्दी होती. सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांकडून मंदिरात पुरोहित सदाशिव गाडगीळ व पुरोहित राघवेंद्र यांच्याकरवी भाविकांकडून श्री गणेश पूजन तदनंतर शिवपिंडीवर दुग्धाभिषेक तसेच बिल्वदलानी अभिषेक करण्यात आला. हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालू होता.
महाशिवरात्रीनिमित्त श्री महादेव मंदिरात साळ, कुमयामळा, खोलपेवाडी ,धुमासे, वडावल , साळ पुनर्वसन तसेच पंचक्रोशीतील इतर गावातील नातेवाईक मोठय़ा संख्येने श्री महादेव मंदिरात उपस्थित राहून शिवपिंडीवर अभिषेक कार्यक्रम पार पडला. सकाळपासून भाविकांची गर्दी उसळली होती. यामुळे एकावेळी अंदाजे 15भाविकांकडून अभिषेक कार्यक्रम पार पाडत होता.
संध्याकाळी 7.00 वाजता झोळमे येथील वझे बुवा यांचे साळ येथील शिष्याकरवी हरिपाठ झाला तसेच साळ पंचक्रोशीतील भजनी कलाकारांकडून रात्री 9.30 वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.