सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी- कोलगांव हायस्कूलमधील सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे तीन संगणक अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. हा प्रकार मंगळवारी दि. १३ जून रोजी उघडकीस आला. हायस्कूलच्या ग्रंथालयातील दोन संगणक व कार्यालयाचा एक संगणक चोरीस गेला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डुमिंग डिसोझा, पोलीस हवालदार मनोज राऊत यांनी पंचनामा केला. ग्रंथपाल दिशा आकेरकर यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.