आम्ही आता गप्प बसणार नाही -संजु परब
सावंतवाडी / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अचानक संगमेश्वर येथे अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी त भाजपच्या वतीने उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार है सावंतवाडी येथील मुख्य रस्त्यावर रस्ता आंदोलन करत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नगराध्यक्ष संजीव परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी अडीच वाजता श्री राणे यांना अटक झाल्यानंतर प्रथम शिवसेनेने आमदार दीपक केसरकर कार्यालय जवळ राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलीस स्टेशन वर जात त्यांना अटक करावी अशी मागणी केली त्यानंतर राणे यांना अटक झाल्यानंतर सावंतवाडीत भाजपच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यालयाजवळील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले काही का रस्ता रोखून धरण्यात आला.
पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंधवळे, आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, परिणीती वर्तक, मेघना साळगावकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, महेश पांचाळ, बंटी जमादार, रवींद्र मडगावकर, महेश धुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री परब पुढे म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने सूडबुद्धीने अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आपली भाषा तपासून पहावी त्याने कित्येक वेळा वेगळ्या शब्दात भाष केलेली आहेत आणि आता राणे यांनी जे वक्तव्य केले त्याचा विपर्यास करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला हे योग्य नाही जोपर्यंत राणे यांच्यावर कारवाई मागे घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.