रोटरी क्लब आणि युवा रक्तदाता संघटनेचे आयोजन
ओटवणे / प्रतिनिधी:
रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सावंतवाडीतील समाजसेवक कै. बाळाभाई बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात
अनेक रक्त दात्यानी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. सद्या कोरोना परिस्थितीमु़ळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून ओरोस व सावंतवाडी रक्तपेढीमध्ये सामान्य रक्तगटाची एक रक्तबॅग मिळवणे रुग्णाच्या नातेवाईकांना मुश्किल होत आहे. त्यामुळे रक्ता अभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा रक्तदाता संघटनेचा माध्यमातून कोरोना काळातील हे ९ वे रक्तदान शिबिर आहे. रक्त संकलन करण्यासाठी सावंतवाडी रक्त पेढी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अँड. सिद्धांत भांबुरे, दिलीप म्हापसेकर, आनंद रासम, रमेश भाट, सुधीर नाईक, वसंत करंदीकर, नितीन हवालदार, पृथ्वीराज चव्हाण, तन्मय चव्हाण, युवा रक्तदाता संघटनेचे अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, देवेश पडते, पार्थिल माठेकर, गौतम माठेकर, साईश निर्गुण, वर्धन पोकळे, संदीप निवळे, अभिजित गवस, डॉ. मुरली चव्हाण, राघु चितारी, सिद्धेश ढेकणे, वसंत सावंत, गौतम सावंत, मंदार सावंत आदी उपस्थित होते.