सावंतवाडी / प्रतिनिधी-
इतिहासकालीन सावंतवाडीत जिमखाना मैदानावरआता रणजी क्रिकेट दर्जाची आताखेळपट्टी तयार होणार आहे. सावंतवाडी नगरपालिकेने नव्याने दर्जेदार खेळपट्टी बनवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच दर्जेदार खेळपट्टी बनवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तज्ञ नियुक्त करण्यात येणार आहेत. 19 लाख रुपये या खेळपट्टीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता हे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या खेळपट्टी बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक व मुख्याधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.