वार्ताहर / सावंतवाडी:
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र ऑगस्ट 2020 करिता मंजूर असलेल्या सुईंग टेक्नॉलॉजी, कारपेंटर, कोपा, इलेक्ट्रिशियन, मोटार मेकॅनिक व्हेईकल, टर्नर, वायरमन तसेच आय ऍन्ड सीटीएसएम या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरणे प्रक्रिया http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 1 ऑगस्टला सकाळी 11 वाजल्यापासून 14 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरल्यावर तो स्वत: पूर्णपणे तपासून माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करायचे आहे.
ऑनलाईन पद्धतीने वरील अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी 2 ऑगस्टला सकाळी 11 वाजल्यापासून 14 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यवसायनिहाय / संस्थानिहाय विकल्प भरावे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी 16 ऑगस्टला संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 16 ऑगस्टपासून 17 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकती नोंदवून अर्जात बदल करता येतील. त्यानंतर प्रवेश फेऱयांना सुरुवात होईल. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी (बाहेरचावाडा), दूरध्वनी (02363-272136) येथे संपर्क साधावा, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यांनी कळविले आहे.